Crime  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : दारुड्या नवऱ्याचा पत्नीने काढला काटा, स्वयंपाक घरातील चाकू छातीत खुपसला

Pune Crime News : दारू पिऊन त्रास देणाऱ्या नवऱ्याला बायकोनं संपवल्याची घटना पुण्यात घडली आहे.

Namdeo Kumbhar

Husband Wife Fight : पुण्यातील नऱ्हे परिसरात पत्नीने नवऱ्याला संपवल्याची घटना समोर आली आहे. नवरा सतत दारु पिऊन त्रास देत असल्यामुळे रागाच्या भरात पत्नीने त्याला संपवले. रविवारी नवरा दारू पिऊन घरी आला. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. पत्नीने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील चाकू घेऊन छातीत खुपसला. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे नवऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या नवऱ्याचा बायकोने खून केल्याची घटना नऱ्हे येथे घडली. वादानंतर पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. स्वयंपाक घरातील चाकू घेऊन छातीत खुपसला त्यामुळे रक्तस्त्राव झाल्याने नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नऱ्हे परिसरात सायंकाळी घडली घटना. आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. नवऱ्याच्या हत्येप्रकरणी सिंहगड पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच नऱ्हे परिसरात एकच चर्चा सुरु झाली.

नेमकं झालं काय होतं?

नवरा वारंवार दारु प्यायचा, त्यामुळे नऱ्हे येथील पती-पत्नीची सतत भांडणे व्हायची. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलत त्याला संपवले. रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घढली. किरप्पा बिश्त (वय ४२, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हिरा बिश्त (४६) हिला सिंहगड पोलिसांनी अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पती-पत्नी नऱ्हे परिसरातील मानाजी नगर येथील स्वप्नपूर्ती रेसिडेन्सीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून राहत होते. किरप्पा हा दारू पिऊन वारंवार पत्नीला त्रास देत होता. रविवारी तो दारू पिऊन आल्यानंतर दोघांचा जोराचं भांडण झालं. त्यांच्यातील वाद विकोलाला गेला, यातच पत्नीने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील चाकू भोसकून त्याला संपवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT