Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात कायदा सुव्यवस्था धाब्यावर; अल्पवयीन तरूणाकडून १० वाहनांची तोडफोड, धक्कादायक कारण आलं समोर

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यात कायदा सुव्यवस्था धाब्यावर आली आहे. शहरात सातत्याने कोयता गॅंगचा धुमाकूळ, गुन्हेगारीच्या घटना घडल्या असल्याचं पाहायला मिळतंय. शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाल्याची घटना समोर आलीय. शहरातील वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूचं असल्याचं दिसत आहे. पुण्यातील महर्षीनगर येथील क्रिसेंट हायस्कूलसमोर वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालंय तर परिसरात मोठं दहशतीचं वातावरण आहे.

दहा वाहनांची तोडफोड

या घटनेत दहा वाहने फोडण्याची माहिती समोर आलीय. यामध्ये टेम्पो आणि चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली असून एका अल्पवयीन तरुणाला या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. स्वारगेट पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. फक्त दहशत निर्माण करण्यासाठी अशा तोडफोडीच्या घटना पुणे शहरात घडत आहे.

अल्पवयीन तरूण पोलिसांच्या ताब्यात

प्राथमिक माहितीनुसार, अल्पवयीन तरुणाने दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केलंय. त्याने महर्षीनगर येथील क्रिसेंट हायस्कूल समोर लावलेला टेम्पो, तीन चाकी मालवाहतूक करणारा टेम्पो आणि मोठा टेम्पो अशा वाहनांवर तीक्ष्ण हत्याराने वार केलेत. वाहनांची तोडफोड करून त्यांचं नुकसान केलंय. या अल्पवयीन तरुणाने याआधी देखील असे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.

पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं

मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख चढलेला दिसत आहे. खून, दरोडे किंवा वाहनांची तोडफोड अशा घटना सातत्याने घडत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. काही महिन्यांपूर्वी शहरात अमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर सापडले होते, तसेच हिट अॅण्ड रनच्या घटनांनी देखील मोठी खळबळ उडालेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT