Pune Unknown Woman Body Found in the Kharadi Area Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे हादरलं! तरुणीची हत्या करून हातपाय तोडले; शीर धडावेगळं केलं अन् नदीत फेकलं

Pune Latest Crime News : पुण्यात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला आहे. या तरुणीची हत्या करून तिचे हातपाय तोडून धड शिरावेगळं करण्यात आलंय.

Satish Daud

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला आहे. या तरुणीची हत्या करून तिचे हातपाय तोडून धड शिरावेगळं करण्यात आलंय. खराडी येथील नदीपात्रात पोलिसांना तरुणीचे धड आढळून आले आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

हत्या झालेल्या तरुणीचे वय अंदाजे 20 ते 30 वर्ष इतके असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात (Pune News) एका कन्स्ट्रक्शनचे काम सुरु आहे.

या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना नदीपात्राजवळ एक मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना (Police) दिली. माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचं दिसून आलं.

धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेहाला हात, पाय नव्हते. तसेच शीर देखील धडावेगळं करण्यात आलेलं होतं. पोलिसांना फक्त तरुणीचे धड सापडले असून मृतदेहाची ओळख पटवणे सुरु आहे. हत्या झालेल्या तरुणीचे वय 20 ते 30 वर्ष इतके असल्याचा प्राथामिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

अज्ञात व्यक्तीने तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची ओळख पटवणे सुरू केले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यातील पोस्टल मतमोजणी संपली, थोड्याच वेळात ईव्हीएम मशीन घेऊ येणार..

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

SCROLL FOR NEXT