Pune Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Crime News : स्मशानभूमीत सुरू होता भयावह प्रकार; पोलिसांनी टाकली धाड, दोन तृतीयपंथीय अटकेत

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत चितेजवळ दोन तृतीयपंथीयांकडून भयावह प्रकार सुरू होता.

Dnyaneshwar Choutmal

Pune Crime News : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत चितेजवळ दोन तृतीयपंथीयांकडून भयावह प्रकार सुरू होता. हा सर्व प्रकार स्मशानभूमीची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच, पोलिस स्मशानभूमीत पोहचले. याप्रकरणी दोन तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय सुरू होतं?

पुण्यात वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत चितेजवळ शुक्रवारी रात्री दोन तृतीयपंथी काही विचित्र अघोरी कृत्य (Crime News) करत असल्याचं सुरक्षारक्षकाने पाहिले. त्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा, तृतीयपंथी काळ्या बाहुल्या, लिंबू तसेच काही फोटो वापरून अघोरी कृत्य करत होते. तसेच काही मंत्राचाही जप ते करत असल्याचंही पोलिसांच्या लक्षात आलं. या प्रकारानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

लक्ष्मी निभाजी शिंदे (वय ३१) आणि मनोज धुमाळ (वय २२) असे अघोरी कृत्य करणाऱ्या आरोपींचे नावे आहेत. शिंदे हा मुंबईचा आहेत तर मनोज धुमाळ हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी मध्यरात्री (Pune) एक ते दोनच्या दरम्यान घडली. स्मशानभूमी मधील सुरक्षारक्षक राऊंड मारण्यासाठी गेले असता त्यांना हे दोघेही आरोपी काळी जादू करताना आढळून आले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT