Teacher Molested Girl Student Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात खळबळ, शिक्षकाने केला ९वीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये शाळकरी मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला. याप्रकरणी शिक्षकाविरोधात हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसरमधील एका शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला. २६ ऑगस्टला ही घटना घडली. पीडीत मुलगी नववीमध्ये शिकते. या घटनेनंतर पीडित मुलगी रडत रडत घरी गेली. त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईसोबत पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर लक्षात घेता हडपसर पोलिसांनी याप्रकरणी शिक्षकाविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी शिक्षक पीडित मुलीला गेल्या अनेक महिन्यांपासून त्रास देत आहे. वर्गामध्ये शिकत असताना तू माझ्याकडेच बघत जा, इकडे तिकडे बघू नकोस, तुला मी घरी सोडतो, असं म्हणत शिक्षक तिला नेहमी त्रास द्यायचा.

२६ ऑगस्टला या शिक्षकाने शाळेच्या मैदानामध्ये उभ्या राहिलेल्या पीडित मुलीच्या जवळ जाऊन तिला तू शिट्टी का वाजवली? असं विचारत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित मुलगी खूप घाबरली. आतापर्यंत हा शिक्षक कसा वागत होता याबाबत ती शांत होती. पण २६ ऑगस्टला घरी गेल्यानंतर तिने आपल्या आईला घडलेली घटना सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला.

दरम्यान, पुण्यातील खडकवासला परिसरात इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. एका विकृत नराधमाकडून खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या घटनेमुळे खडकवासला परिसरामध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात ६७ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner News : शेतीतून उत्पन्न नाही, दूध व्यवसायात नुकसान; विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Papaya Face Pack : पपईपासून बनलेला हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा; स्किनवरील डाग चुटकीसरशी होतील गायब

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT