Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News : वडिलांचा खून करून दृश्यम चित्रपटाप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट; दोघे सख्खे भाऊ गजाआड

खून करून दृश्यम चित्रपटातील कथेप्रमाणे या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे

रोहिदास गाडगे

Pune Crime News : वडीलांचा महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने तरुण मुलांनीच वडीलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून करून दृश्यम चित्रपटातील कथेप्रमाणे या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना महाळुंगे पोलिसांनी (Police) अटक केली आहे. धनंजय असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुजित आणि अभिजित दोघा भावांना केली आहे. (Pune Latest Crime News)

चाकण औद्योगिक क्षेत्रात धनंजय यांचा फरसाण विक्रीचा व्यवसाय असून ते कुटुंबासमवेत रहात होते. याप्रकरणी तक्रार नोंदवून तपास सुरु केला असता धनंजय यांचे नागपूर येथील महिलेशी सोशल मीडियाद्वारे ओळख होऊन दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. धनंजय यांच्या विवाहबाह्य प्रमेसंबंधांची माहिती समजल्यानंतर घरात पत्नी आणि मुलांसोबत त्यांचे वाद होऊ लागले. त्यामुळे आपली मुले आपला घातपात करून जीवे ठार मारतील, अशी शंका त्यांना आली होती व ती त्यांनी नागपूर (Nagpur) येथील प्रेयसीस बोलून दाखवली होती.

दरम्यान, धनंजय हे बेपत्ता असल्याबाबत तपास करताना पोलिसांना त्यांच्या प्रेयसीबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. त्यामुळे धनंजय यांच्या दोन मुलांनी १५ डिसेंबरच्या रात्री साडेबाराच्या दरम्यान त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह कंपनीच्या भट्टीत टाकला व तो पूर्णपणे जाळला. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी त्यांनी पोलिसात ते बेपत्ता असल्याची फिर्याद दिली, अशी माहिती समोर आली आहे. मात्र प्रियशीच्या माहितीने महाळुंगे पोलीसांनी तपास करत दोन मुलांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

AAP: 'न्याय मिळण्याची अपेक्षा संपली'; केजरीवालांचा न्यायाधीशांच्या निष्पक्षतेवरच सवाल

यंदा उष्माघातानं लाखो बळी जाणार? जगावर पुन्हा 'सुपर एल निनो'चं संकट?

Investment Scheme:भरघोस रिटर्न्ससाठी सरकारची नवी योजना? 22 हजार गुंतवा, साडेतीन लाख कमवा?

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

SCROLL FOR NEXT