Pune Crime Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime: केस ओढले, गालगुच्चे घेतले... महिला शिक्षिकेचे अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत संतापजनक कृत्य; खळबळजनक घटना

Pune Kothrud News: या प्रकरणात 40 वर्षीय शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Kothrud Crime News: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे (Pune) शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका शाळेत तीन वर्षीय विद्यार्थीनीसोबत महिला शिक्षिकेने अश्लिल कृत्य केल्याचा प्रकार घडला. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांची तीन वर्षाची मुलगी कोथरूड (Kothrud) परिसरातील एका शाळेत शिक्षण घेते. मुलीने शाळेतून घरी आल्यानंतर शिक्षिकेविरोधात आपल्या वडिलांकडे तक्रार केली.

ज्यामध्ये तिने "अंजना टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, हात कापू का, तुला मेणबत्तीचे चटके देईन, आणि घरच्यांना सांगायचे नाही" असे म्हणत असल्याचे सांगितले. मुलीच्या तक्रारीनंतर पालकांनाही धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत संबंधित महिला शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली.

या तक्रारीनुसार, कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) 40 वर्षीय शिक्षिके विरोधात भादवी 323, 506, ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

SCROLL FOR NEXT