Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पाच अल्पवयीन मुलांकडून तरुणाची दगडाने ठेचून हत्या; थरारक घटनेनं पुण्यात खळबळ

Crime News: हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी रात्री एक ते तीनच्या दरम्यान ही घटना घडलीये.

Ruchika Jadhav

Pune News:

पुण्यात सातत्याने गुन्हेगारी विश्वातील घटनांमध्ये वाढ होत आहे. आता देखील एक विचित्र घटना समोर आलीये. किरकोळ वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी रात्री एक ते तीनच्या दरम्यान ही घटना घडलीये. (Latest Marathi News)

महादेव रघुनाथ मोरे (वय २६, रा. काळेपडळ, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन पाच मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव आणि अल्पवयीन ५ मुलं एकमेकांना आधीपासून ओळखत होते. यातील एक मुलगा शाळेत शिक्षण घेत आहे. तर बाकीचे हाताला मिळेल ते काम करुन आपलं पोट भरतायत. तसेच मृत महादेव हा एक खासगी कंपनीत कामाला होता.

काही दिवसांपूर्वी ही मुलं आणि महादेव भेटले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. मुलांना या गोष्टीचा फार राग आला. त्यांनी आपल्या मनात रागधरत पुन्हा महादेवची भेट घेतली. यावेळी हे सर्वजण रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळ डोंगरावर मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी गेले. तिथे असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामरीत होऊन मुलांनी त्याला मारहाण करत दगडाने ठेचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT