Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime : धावत्या बसमध्येच कंडक्टरचं तरुणीसोबत धक्कादायक कृत्य; पुण्यातील संतापजनक घटना

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एका पीएमपीएमएलच्या बस कंडक्टरने एका तरुणीचा विनयभंग केला. रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

तरुणीची तक्रार दाखल होताच, पोलिसांनी गुन्हा दाखल करत बस कंडक्टरला अटक केली आहे. विश्वनाथ (वय ४१ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या बस कंडक्टरचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत घडली. २२ वर्षीय पीडित तरुणी पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करीत होती. दरम्यान, प्रवास करत असताना बसमधील कंडक्टर विश्वनाथ याने पीडितेसोबत अंगलगट केले.

हा सगळा प्रकार दाते बस स्टॉप सहकारनगर ते के.के मार्केट धनकवडी या दरम्यान घडला. ही घटना घडताच पीडित तरुणीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीची पोलिसांनी तत्काळ दखल घेतली.

पोलिसांनी आरोपी कंडक्टर विश्वनाथ याला ताब्यात घेऊन रात्री उशिरा विनयभंगाच्या (Crime News) गुन्हा दाखल करून अटक केली. महापालिकेच्या बसमधील कंडक्टरनेच तरुणीचा विनभंग केल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोरात कठोर पाऊलं उचलणं गरजेचं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

Railway Fare Hike: मुंबई-पुणे प्रवास महागणार का? आजपासून रेल्वेचे नवीन तिकीट दर लागू, वाचा किती झाली वाढ

Heart Attack: झोपेतून उठताच थकवा जाणवतो? असू शकतं हार्ट अटॅकचं लक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर २७ गावांचा एल्गार; मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा

Kitchen Hacks : रोज १५ मिनिटांत या सोप्या टिप्सने घर झटपट आवरा, तासनतास वेळ लागणारच नाही

SCROLL FOR NEXT