Pune Crime News
Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: दाेस्त दाेस्त ना राहा! मैत्रिणीनीचे केला मैत्रिणीचा विश्वासघात; प्रकरण थेट पाेलीस ठाण्यात

Shivani Tichkule

सचिन जाधव

Crime In Pune: पुण्यात एका मैत्रिणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिला तिच्या मित्रानेच फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्या नावावर तब्बल ६९ लाखांचे कर्ज घेत तिची फसवणूक केली आहे.

एका मैत्रिणीने दुसर्‍या मैत्रिणीला कर्ज काढायला भाग पाडून कर्जाचे हप्ते न फेडल्याने तब्बल ६९ लाखाला गंडा घातला आहे. पीडित मैत्रिणीने याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

पिडीत महिलेने काही कर्जाचे हप्ते कसेबसे फेडले. मात्र कर्जाचे हप्ते थकल्याने ती मैत्रिणीकडे तिच्या आई-वडिलांकडे आणि बहिणीकडेही दाद मागण्यास गेली. मात्र तिला मैत्रिणीच्या आई-वडिलांनी मारहाण केली, तर बहिणीने संपवून टाकण्याची धमकी दिली.

पोलिसांनी (Police) कल्याणी शशीकांत लोणकर, शशीकांत वसंत लोणकर, समिधा शशिकांत लोणकर, ऋतीका लोणकर,सुशील लोणकर,उत्तम शेळके याच्यावर गुन्हा दाखल केलाय.याप्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. (Pune News)

फिर्यादी महिलेची कल्याणी ही मैत्रीण असून एकाच सोसायटीत दोघी राहायच्या. कल्याणीने फिर्यादीला माझे वैवाहिक जीवन संपुष्टात येत आहे.मी खूप अडचणीत येत आहे. मला तातडीने ५० ते ६० लाखांची गरज सांगून फसवणूक केलीय.याबाबत फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती.त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानुसार आता पोलीस तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

Maharashtra Politics 2024 : मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ; नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SRH Qualify For Playoffs: हैदराबादची झाली 'चांदी'; एकही चेंडू न खेळता मिळालं प्लेऑफचं तिकीट

Maharashtra Politics 2024 : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर; शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा

SCROLL FOR NEXT