पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात (Vanraj Andekar Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी आरोपींनी कट रचला होता. त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी संपूर्ण तयारी करूनच रविवारी त्यांची हत्या केली. यासाठी आरोपी दीड महिन्यांपासून वनराज यांच्यावर लक्ष ठेवून होते. अखेर रविवारचा दिवस गाठून आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. वनराज आंदेकरांच्या हत्येसाठी आरोपींनी कसा प्लॅन रचला होता याबद्दल आपण पूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहोत....
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपासून वनराज यांच्यावर हल्लेखोरांचे लक्ष होते. वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी ३ पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. वनराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते, जयंत कोमकर यांनी प्लॅन आखला होता. सोमनाथ गायकवाडने अनिकेत दुधभातेला या हल्ल्याची माहिती दिली होती.
रविवारी दुपारी वनराज आंदेकर यांच्यावर हल्ल्याचा प्लॅन आखला गेला आणि रात्री आंदेकर यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. अनिकेत दुधभातेने इतर आरोपींची जुळवाजुळव केली. त्यानंतर त्यांना घेऊन तो नाना पेठेत आला आणि येऊन वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार केले. आंदेकर यांच्यावर हल्ला केल्यानंतर कुठल्या रस्त्याने पळून जायचं हे देखील आरोपींनी पूर्वनियोजित केले गेले होते. आरोपी दुचाकीवरून आले आणि दुचाकीवरूनच पळू गेले.
वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी अटके केली आहे. सुरूवातीला ५ जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्या दोन बहिणी, २ मुहुणे आणि सोमनाथ गायकवाड यांचा समावेश होता. हे आरोपी सध्या पोलिस कोठडीमध्ये आहेत. त्यानंतर पुणे पोलिसांनी रायगडच्या ताम्हणी येथून १३ जणांना मंगळवारी अटक केली. यामधील अनेक जण हे अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या हत्याप्रकरणात सोमनाथ गायकवाड हाच मुख्यसूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे.
सोमनाथ गायकवाड या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ते त्याची चौकशी करत आहेत. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत सोमनाथ गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर कोयता आणि स्कू-ड्रायव्हरने हल्ला केला होता. या या हल्ल्यात निखिल आखाडेचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून त्यांच्या हत्येचा प्लॅन आखला होता. वनराज आंदेकर यांचे त्यांच्या दोन बहिणी आणि मेहुण्यांसोबत देखील वाद होते. त्यांच्या दुकानावर अतिक्रमण कारवाई झाली होती. ही कारवाई वनराज यांच्या सांगण्यावरून झाली असल्याचा संशय त्यांना होता. त्यामुळे त्यांनी वनराज यांना मारण्याची धमकी देखील दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.