Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : मोक्कामधील आरोपी नाना गायकवाड याच्यावर लोखंडी पत्र्याने हल्ला

या घटनेमुळे येरवडा मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune News : मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार नाना गायकवाड याच्यावर येरवडा कारागृहात हल्ला करण्यात आला आहे. नाना गायकवाड हा मोक्कामधील आरोपी असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

त्याच्यावर येरवडा कारागृहात एका कैद्याने पत्र्यासारख्या एका वस्तूने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (ता.३) दुपारी बाराच्या सुमारास कारागृहातील खोली क्रमांक एकसमोर घडली. या घटनेमुळे येरवडा मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली.

सोलापूरच्या (Solapur) गँगवार मधील देवा या नावाच्या आरोपीने नाना गायकवाड याच्यावर हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. नेमका या दोघांमध्ये काय वाद झाले हे अद्याप स्पष्ट नाही. बलात्कार, खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे नाना गायकवाड याच्यावर दाखल आहेत. त्याच्यावर मोका अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांच्यावर २०२१ मध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे तसेच जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात त्याच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. नाना याच्यावर बेनामी जमीन बळकवल्याचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्याकडे १०० कोटी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती सापडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT