Youth Killed By 6 People In Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यामध्ये पुन्हा 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरचौकात ६ जणांनी तरुणाची केली निर्घृण हत्या

Youth Killed By 6 People In Pune: कोयत्याने भोसकून एका टोळीने तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे कोथरूड (Kothrud) परिसरात खळबळ उडाली आहे. अलंकार पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये (Pune Crime) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशामध्ये पुण्याच्या कोथरूड परिसरात 'मुळशी पॅटर्न'सारखी (Mulshi Pattern) घटना घडली आहे. कोयत्याने भोसकून एका टोळीने तरुणाची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे कोथरूड (Kothrud) परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी मुळशीमधून सर्व आरोपींना अटक केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये एका टोळक्याने कोयत्याने सपासप करुन तरुणाची हत्या केली. सहा जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयता आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कोथरुड येथील डहाणूकर कॉलनीत गुरूवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे कोथरूड परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवला. श्रीनू बिसलावत असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. एकमेकाकडे बघण्यावरुन आणि पूर्व वैमनस्यातून श्रीनूची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर या प्रकरणातील सर्व आरोपी फरार होते. अलंकार पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु होता. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची ४ पथकं तयार करण्यात आली होती. अखेर या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुळशीमधून या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामधील एक जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व आरोपींना पुण्यामध्ये आणण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor election : भाजप मुंबईचा वचपा ठाण्यात काढणार, नंबरगेमसाठी तडजोडी, सत्तेसाठी फोडाफोडी?

Success Story: खामगावच्या लेकीची कमाल! कठीण परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षा पास; CRPF पदावर निवड

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा या चटपटीत 10 रेसिपी

Maharashtra Live News Update: बाळा भेगडेंना भाजपमध्ये कोण विचारतं? - शेळके

Akshay Kumar Car Accident: मुंबईत अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीचा भयंकर अपघात; मर्सिडिजची ऑटोला जोरदार धडक | VIDEO

SCROLL FOR NEXT