Ambegaon Taluka Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: आंबेगावमध्ये विवाहित महिलेवर प्रियकराच्या ४ मित्रांकडून सामूहिक अत्याचार; जंगलात भेटायला गेल्यावर घडलं भयंकर

Ambegaon Taluka Crime News: प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर प्रियकराच्या मित्रांनीच सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

रोहिदास गाडगे

Pune Ambegaon Taluka Crime News: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर प्रियकराच्या मित्रांनीच सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon News) एका गावातील रहिवाशी आहे. शुक्रवारी (२३ जून) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जंगलात गेली होती. यावेळी तिच्या प्रियकराच्या चार मित्रांनी दोघांचाही पाठलाग केला.

दोघांनाही जंगलात एकटं पाहून चार नराधमांनी (Crime News) डाव साधला. आरोपींनी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला

दरम्यान, या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने तातडीने घोडेगाव पोलिसांत (Police) धाव घेतली. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चार आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT