Pune Koyta Gang Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम, वाहनांची तोडफोड आणि घरावर दगडफेक; हडपसरमध्ये तणावाचे वातावरण

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरासह आसपासच्या परिसरामध्ये कोयता गँगची दहशत कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दहशत माजवण्यासाठी ही कोयता गँग तोडफोड, दमदाडी तर कधी हल्ला देखील करते. नुकताच पुण्यातील हडपसरमध्ये टोळक्याने एका कुटुंबाला शिवीगाळ करत कोयत्याने वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील साडे सतरा नळी येथे कोयता गँगने तुफान राडा केला. दत्त नगरमध्ये ही घटना घडली. याठिकाणी टोळक्याने एका कुटुंबाला शिवीगाळ केला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने वाहनांची तोडफोड करत मोठे नुकसान केले. इतकेच नाही तर या टोळक्याने हवेत कोयते फिरवून एका घरावर दगडफेकही केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांना बापू मकवाना आणि प्रसाद ढगे यांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी परिसरात मोठ-मोठ्याने शिवीगाळ करत दहशत पसरवली. तक्रारदारांना शिवीगाळ केली. नंतर टेम्पोच्या काचा फोडत हातातील कोयते हवेत फिरवून दहशत माजवली. पुढे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी खाली पाडून गोंधळ घातला. तसेच एका घरावर दगडफेक देखील केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

तर कोयता गँगने हडपसरमधील आणखी एका ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील हडपसरमध्ये मध्यरात्री अज्ञात टोळक्याने बस पेटवली. नाना परमेश्वर हंगे यांची टेम्पो ट्रॅव्हल्स बस अज्ञात टोळकाने पेटवून दिली. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या काळेपडळ भागात ही घटना घडली. हातात कोयते आणि तलवारी घेऊन आलेल्या चार ते पाच जणांनी टेम्पो ट्रॅव्हल्सवरती पेट्रोल टाकून पेटवून दिला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT