Pune Koyta Gang News
Pune Koyta Gang News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत; गोसावी वस्तीत तरुणावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Prachee kulkarni

Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कोयता गँगमधील गुंडांच्या पोलिसांकडून मुसक्या आवळणे सुरू आहे. एकीकडे नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या कोयता गँगच्या गुंडांची पोलिसांकडून भररस्त्यात धिंड काढली जात असताना, दुसरीकडे पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune) सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळील गोसावी वस्तीत कोयता गँगच्या गुंडांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. विजय विठ्ठल मरगळे (वय ३१ वर्ष ,रा. नांदेड ता. हवेली जि पुणे) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी हवेली पोलिसांनी (Police) चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. सुरज उर्फ सागर संतोष सहा (वय २१), मुकुंद उर्फ मुक्या चंद्रकांत चव्हाण (वय २३), शुभम उर्फ झेंड्या दिलीप पवार(वय, २२) व अजय विजय आठवले (वय १९) सर्व राहणार गोसावी वस्ती, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, विजय मरगळे हा गोसावी वस्ती येथील त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. मित्र आणि तो खाली इमारतीच्या पार्किंगला थांबलेले असताना अचानक हातात कोयते, लोखंडी रॉड घेऊन आलेल्या पाच ते सहा जणांनी विजयवर हल्ला केला.

या हल्ल्यात विजय मरगळे हा गंभीर (Crime News) जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

SCROLL FOR NEXT