Pune Prostitution Racket News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पहिल्या मजल्यावर फ्लॅटमध्ये सुरू होता भयंकर प्रकार; धाड टाकल्यानंतर रूममधलं दृश्य बघून सगळेच हादरले

Pune Prostitution Racket News : पुण्यातील उत्तमनगर भागात अनैतिक वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

Alisha Khedekar

  • पुण्यात अनैतिक वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

  • गुन्हे शाखेच्या धाडीत दोन महिलांची सुटका

  • आरोपी महिला अटकेत

  • मानवी तस्करीविरोधात पोलिसांची ठोस कारवाई

सचिन जाधव, पुणे

पुणे हे विद्येचं माहेर घर आहे. या पुण्यात अनेक विद्यार्थी बाहेरगावाहून शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र याचं पुण्यात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. य घटनेने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

तक्रारीनुसार, आरोपी महिलेने दोन पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. नंतर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन, त्यातून मिळणाऱ्या रकमेवर स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गौरी विकास पवळे (वय ४५, रा. बधे कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

पोलीस हवालदार वैशाली खेडेकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.या व्यवसायाची माहिती समजताच पोलिसांनी सापळा रचून ठरलेल्या प्लॅनिंगनुसार धाड टाकली. पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी स. नं. २८०, फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, योगीराज कॉम्प्लेक्स, सरस्वती नगर, उत्तमनगर, पुणे येथे करण्यात आली.

या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात कलम १४३(३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम (PITA) कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यात अवैध दारूभट्टी पोलिसांकडून उध्वस्त

पुण्यात वाघोली परिसरात अवैध दारू भट्टी पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आली आहे. गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या २ आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी पुण्यातील वाघोली परिसरात एक जागा भाड्याने घेऊन दारूची मोठी हातभट्टी अवैधरित्या उभा केली होती.पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकत कारखाना उध्वस्त केला. घटनास्थळावरून 2 लाख 80 हजार रुपयांचे 8000 लिटर रसायन जप्त करण्यात आलं आहे. प्रल्हाद कदम राठोड, अंकिता गणेश गुडदावत अशी करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT