Gym owner Yogesh Banekar shot at in Pune's Sahakarnagar area; 
मुंबई/पुणे

Pune Firing: जिम मालकावर अल्पवयीन तरुणांकडून गोळीबार; २ तासांत आरोपी ताब्यात, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Pune Firing : पुण्यातील सहकार नगर भागात गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी दोन तासांच्या आतच अल्पवयीन मुलांसह आरोपींना ताब्यात घेतले.

Akshay Badve

  • पुण्यातील सहकारनगरमध्ये गोळीबार

  • जिम मालक योगेश बनेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

  • जुन्या वादातून चार अल्पवयीन आरोपींनी हल्ला केल्याची माहिती.

पुण्यातील सहकारनगर भागात बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या ४ जणांनी योगेश बनेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार तीन राऊंड फायर केले. या घटनेत संबंधित तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून या चौघांनी गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे.

पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बनेकर हा नेहमीप्रमाणे आपल्या नियमित मार्गाने जात होता, त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. दुचाकीवरून आलेल्या चार आरोपींनी आधी त्याची रेकी केल्याचा संशय आहे. आरोपींकडे पिस्तूलासह धारदार शस्त्रे देखील होती. त्यांनी बनेकर यांच्यावर अचानक गोळीबार केला. यात दोन गोळ्या योगेश बनेकर यांना लागल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी बनेकर याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची ओळख पटली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

पुण्यातील घटनांवर नीलम गोऱ्हे यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट

राज्यातील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थांची विक्री, गर्भलिंग निदान आणि पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील संघटित गुन्हेगारी यासह विविध प्रकरणी शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या व मुंबईतील अमली पदार्थ विक्री, विषारी दारू प्रकरणातील गुन्हेगारी साखळी उघड करण्यासह राज्यातील गर्भलिंग निदान प्रकरणांमध्ये होत असलेल्या तपास व कायदेशीर प्रक्रियेच्या विलंबाकडे लक्ष वेधले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT