Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात तरुणांची फसवणूक, क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली २.२५ कोटींचा गंडा!

Pune Crime : क्रिप्टो करन्सीमध्ये परताव्याच्या आमिषाने २.२५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे प्रतिनिधी

Pune Crime News : पुण्यात क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली पुण्यातील तरुणांना सव्वा दोन कोटींची फसणूक झाल्याचं समोर आलेय. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ माजली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी ब्लॅक ओरा क्लासिक यू-ट्युबरविरुध्द गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. फुरसुंगी येथे हा प्रकार घडलाय.

पुण्यातील एका तरुणासह त्यांच्या काही मित्रांची सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पुण्यातील फुरसुंगी येथील भेकराईनगर परिसरात जानेवारी २०२२ पासून सुरू होता. एका ३० वर्षीय तरुणाने याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून इसाक बागवान, फाऊंडर इस्माईल, दस्तगीर पटेल, जहाँगीर खान, झिशान हेबळीकर आणि ब्लॅक ओरा क्लासिक यू-ट्युबरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याचा सखोल तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाने आरोपींकडे ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर फिर्यादीला २८ लाख रुपये परतावा मिळाला. परंतु आरोपींनी फिर्यादी तरुणाला ती रक्कम न देता, इतर ठिकाणी गुंतवणूक केली. तसेच, फिर्यादीसह त्यांच्या मित्रांनीही सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची गुंतवणूक केली. परंतु आरोपींनी त्यांनाही कोणताही परतावा दिला नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

New Labour Law: नवीन कायदा लागू; तुमचा पगार कमी होणार की वाढणार? लेबर कोडमध्ये नेमकं काय?

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

SCROLL FOR NEXT