Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात महिलांची सुरक्षा धोक्यात; गुन्हेगारीची धक्कादायक आकडेवारी आली समोर

Crime Against women:महिला अत्याचाराच्या दररोज सरासरी ९ घटना शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होत असून,त्याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

Ruchika Jadhav

सचिन जाधव

Pune News: राज्यात महिला बेपत्ता होण्याविषयी सध्या राज्यात जोरदार राजकीय आरोप -प्रत्यारोप होत आहेत. अशात पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला अत्याचाराच्या दररोज सरासरी ९ घटना शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होत असून,त्याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. (Crime News)

त्यात प्रामुख्याने विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देणे, बलात्कार, विनयभंग आणि अपनयन, अपहरण अशा घटनांचा समावेश आहे. मे महिन्यातील २० दिवसांत महिलांबाबत वेगवेगळ्या १७५ घटना पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. या वर्षातील चार महिन्यांत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, गर्दी - मारामारी अशा ५६८ गुन्ह्यांची नोंद शहर पोलिस दलात झाली होती.

त्याचवेळी महिलांविषयक ७९५ गुन्हे दाखल झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी वाळूज येथे देखील महिलेवरील अत्याचाराची एक मोठी घटना समोर आली. गुन्हेगाराची माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयावरून एका चाळीस वर्षीय महिलेस मारहाण करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला कुटुंबासह वाळूज परिसरात वास्तव्यास होती.

काही दिवासांपूर्वी नाशकात देखील अशीच एक विचित्र घटना घडली आहे. येथे विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना इगतपुरी तालुक्यातील खंबाळेमध्ये घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT