Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : खरेदी करण्यासाठी आला अन् सोन्याची चैन घेवून झाला फरार; पुण्याच्या वाघोलीतील घटना

Pune News : पुण्याच्या वाघोली येथील डी. बी. ज्वेलर्सचे सराफ व्यावसायिक व रवि घुले यांची ओळख होती. दरम्यान घुले हा चैन घेण्याच्या बहाण्याने दुकानात आला होता.

Rajesh Sonwane

सचिन जाधव 

पुणे : सराफ दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तरुणाने दुकानातील दोन चैन गळ्यात घालून धूम ठोकली. सदरची घटना वाघोलीतील डी. बी. ज्वेलर्स येथे घडली. या प्रकरणी पाथर्डी (जि. नगर) येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

पुण्याच्या वाघोली येथील डी. बी. ज्वेलर्सचे सराफ व्यावसायिक व रवि घुले यांची ओळख होती. दरम्यान घुले हा चैन घेण्याच्या बहाण्याने दुकानात आला होता. त्याला सोन्याच्या दोन चैन दाखविल्यानंतर एक चैन त्याने गळ्यात घातली. यानंतर घातलेली चैन तो आरशात बघत होता. या दरम्यान दुकानदार दुसऱ्या ग्राहकांशी बोलण्यात व्यस्त असल्याचे पाहून नजर चुकवून तो दुकानातून फरार झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

सदर प्रकार सराफाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला. यानंतर मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता  त्याचा मोबाईल देखील बंद आला. याप्रकरणी सोने दुकानदारांनी फिर्याद दिली असून रवी पोपट घुले (वय ३४, रा. पाथर्डी, अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर सराफाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

Maharashtra Live News Update: राहुल गांधी यांची नाशिक न्यायालयातील पुढील सुनावणी पुढे ढकलली

Aanandi Joshi : तिचं क्लिव्हेज किती डिप... मराठी गायिकेला पुण्यातील डॉक्टरचा आक्षेपार्ह मेसेज; नाव अन् पत्ता शोधून...

Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Nilesh Ghaywal Video : गुंड निलेश घायवळचा भाजपच्या राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT