Mundhwa Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : धक्कादायक! गर्लफ्रेंडला भेटायला आला अन् तिच्या मैत्रिणीबरोबरच केलं भयंकर कृत्य; पुण्यातील प्रकार

Crime news : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Crime in Pune : राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

एकत्र राहणाऱ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड मुंबईहून (Mumbai) तिला भेटायला पुण्यात आला होता. त्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीबरोबरच अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग केला. मुंढव्यातील केशवनगरमधील एका सोसायटीत हा प्रकार घडला. याप्रकरणी एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस (Police) ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी अजिंक्य सावंत याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही तिच्या मैत्रिणीसोबत केशवनगरमधील एका सोसायटीत भाड्याने राहत होती. पीडित तरुणी येरवडा येथील एका कंपनीत वरिष्ठ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते. मैत्रिणीचा बॉयफ्रेंड अजिंक्य सावंत हा तिला भेटायला मुंबईहून पुण्यातआला होता. 7 एप्रिल रोजी पीडितेच्या मैत्रिणीचा प्रियकर अजिंक्य रमेश रात्री 10.30 वाजता त्यांच्या फ्लॅटवर आला. 

पीडितेच्या मैत्रिणीने तिच्या प्रियकराची इतरांशी ओळख करून दिली. ते बाल्कनीत बोलत होते आणि अजिंक्य दारू प्राशन करत होता. 8 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता पीडिता झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेली.

सकाळी 7.30 वाजता तिला कोणीतरी स्पर्श करत असल्याचे जाणवले. ती उठली आणि तिच्या समोर अजिंक्य नग्न अवस्थेत उभा असल्याचे तिला दिसले. फिर्यादीस स्पर्श करुन तिच्या अंगावर पडला. त्याला विरोध करताच मारहाण केल्याचाही आरोप फिर्यादी तरुणीने केला आहे. पीडितेने तात्काळ खोली सोडली आणि तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि तातडीने ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी अजिंक्य सावंत याला अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, महिलेला परत आणून दिला दागिना

Post Diwali Care: दिवाळीनंतर खूप थकवा अन् चेहरा डल दिसतोय? मग हे सोपे उपाय ठरतील बेस्ट

laughter chefs 3: सहा महिन्यांतच 'लाफ्टर शेफ्स'च्या नव्या सीझनची सुरुवात; 'हे' फेमस स्टार्स लावणार कॉमेडीचा तडका

Maharashtra Live News Update: ऐन दिवाळीमध्ये गांधीनगर व्यापार पेठेत फोडली ८ ते १० दुकाने

Mokhada : ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर; वैद्यकीय अधिकारी नसल्याने बालकाचा मृत्यू?, नातेवाईकांचा आरोप

SCROLL FOR NEXT