मुंबई/पुणे

Pune Crime News : "ब्लू बेल्स" शाळेच्या इमारतीत घडत होत्या नको त्या घटना; संतापजनक कृत्यांमुळे शाळेची मान्यत रद्द

Education Crime : काही दिवसांपूर्वी या शाळेच्या इमारतीत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ने २ मजले सील केले होते.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्यातील कोंढवा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोंढवा भागात असणाऱ्या "ब्लू बेल्स" शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या शाळेच्या इमारतीमधील राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) २ मजले सील केले होते. अशात आता या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, "ब्लू बेल्स" शाळेचे स्व मान्यता पत्र रद्द करण्यात आले आहे. या शाळेने खोट्या आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून स्वमान्यता पत्र प्राप्त केले होते अशी माहिती समोर आली. पुणे जिल्हा परिषदेनेमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.

शाळेची चूक तरी काय?

दहशतवादी कारवाया तसेच तरुणांना देशविरोधी कृत्यांसाठी भडकवणे अशा कामांसाठी शाळेतील २ मजले वापरल्याचा दावा NIA ने केला आहे. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी ही जागा सील केली होती. यानंतर येथे असलेल्या शाळेची चौकशी शिक्षण (Education) विभागाकडून करण्यात आली.

दरम्यान, "ब्लू बेल्स हाय स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज" हे बोगस असल्याचे आढळून आले होते. शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत ही शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. आता या शाळेचे स्व मान्यता पत्र रद्द करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT