Daund Theft News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : मुसळधार पाऊस, वस्तीवर काही लोकं आली अन् एकच आरडाओरडा, दौंडमधल्या चोरीची अख्ख्या पुण्यात चर्चा

Pune Daund Crime News : केडगावमध्ये शनिवारी रात्री १२ वाजनाच्या सुमारास दौंड तालुक्यातील केडगावमधील मोरे वस्तीवर ५ ते ६ जणांच्या अज्ञात टोळक्याने चोरी करण्याच्या उद्देशाने एका शेतकऱ्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले आहेत.

Prashant Patil

पुणे : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातलं आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होत आहे. मात्र, अशातच दौंडमध्ये भर पावसात चोरट्यांचा धुमाकुळ पाहायला मिळाला आहे. चोरट्यांनी पावसाचा फायदा घेत चोरी केली आहे. इतकंच नाहीतर या हल्ल्यामध्ये एक शेतकरीही जखमी झाला आहे. दौंड तालुक्यातील केडगावमध्ये ही घटना घडली आहे.

घटना नेमकी काय घडली?

केडगावमध्ये शनिवारी रात्री १२ वाजनाच्या सुमारास दौंड तालुक्यातील केडगावमधील मोरे वस्तीवर ५ ते ६ जणांच्या अज्ञात टोळक्याने चोरी करण्याच्या उद्देशाने एका शेतकऱ्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले आहेत. यात मोरे वस्तीमधील ६० वर्षीय पोपट मोरे हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. तर याच परिसरातील देशमुख भागात अशोक देशमुख यांच्या घरी देखील चोरट्यांनी दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे.

पोपट मोरे हे आपल्या राहत्या घरासमोर झोपलेले असताना अचानक आलेल्या या चोरट्यांनी पोपट मोरे यांच्यावर कोयत्याने वार केला. तर पोपट मोरे यांचे बंधू बाळासाहेब मोरे यांना देखील चोरट्यांनी गळ्याला चाकू लावत धमकावले. त्यांनी आरडाओरडा केल्यानं चोरटे पसार झाले. यातील जखमी पोपट मोरे यांच्यावर केडगावमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भेट दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: महिला वकिलानं बलात्कार केल्याचा पुरुषाचा आरोप, कुठं-कुठं नेलं? तक्रारीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Maharashtra Live News Update: रसायनी एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत भीषण आग

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा भर सभेत थेट उदय सामंत यांना फोन, टाळ्यांचा कडकडाट, नेमके काय घडले? नंतर गडबड..., VIDEO

Nashik Crime: मालेगाव पुन्हा हादरलं! १३ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार, ५५ वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या जवळच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT