Pune kidnapping case  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

पुणे हादरले! भरवस्तीतून १८ वर्षांच्या तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Pune crime news today : पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात १८ वर्षीय तरुणीची छेडछाड करून तिला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीच्या आरडाओरड्यानंतर स्थानिक नागरिकांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune kidnapping attempt CCTV : पुणे शहरात महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कात्रज-कोंढवा रोडवरील गर्दीच्या सुखसागरनगर परिसरात एका १८ वर्षीय तरुणीची छेडछाड करून तिला भरदिवसा बळजबरीने उचलून नेण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मात्र, ऐन वेळी स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला.

संतप्त नागरिकांनी नराधम आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जितू किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या मवाली आरोपीचे नाव आहे.

नक्की काय घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही थरारक घटना शनिवारी सायंकाळी घडली. संबंधित १८ वर्षीय तरुणी सुखसागरनगरमधील समर्थ डेअरीसमोर आपल्या मैत्रिणीची वाट पाहत थांबली होती. ती एकटीच असल्याचे पाहून नराधम जितू सरोज तिच्याजवळ आला. त्याने अत्यंत विकृतपणे तरुणीची छेड काढली. त्याने थेट तिच्या छातीला हात लावला आणि शर्ट ओढून तिला बळचकीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला.

या अचानक झालेल्या हल्ल्याने आणि अपहरणाच्या प्रयत्नाने तरुणी हादरली, पण तिने प्रचंड धाडस दाखवत जोरदार आरडाओरडा सुरू केला.

तरुणीचा किंकाळी आणि आरडाओरडा ऐकून तिची मैत्रीण आणि आजूबाजूला असलेले स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. प्रकार लक्षात येताच संतापलेल्या नागरिकांनी एका क्षणाचाही विलंब न करता त्या नराधमाला पकडून चोप दिला. यादरम्यान आरोपीने मग्रुरी दाखवत एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडला आणि नुकसान केले. जमावाने आरोपीला बेदम चोप दिला अन् पोलिसांना बोलावले.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या धक्कदायक प्रकारामुळे पुणेकर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळात मॅरेथॉनसाठी पुणे महापालिकेचे ५० लाख? रवींद्र धंगेकरांचा आयुक्तांना थेट सवाल

LPG Cylinder Price: आज रविवारी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त झाला? मुंबई, दिल्लीसह पाहा इतर शहरांतले नवे दर

Dizziness Problem: चालताना अचानक चक्कर येतेय? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

मऊ आणि गोल चपात्या कशा बनवायच्या? जाणून घ्या सोप्या टिप्स

Natural Skin care : तांदळाच्या पिठाचा असा करा वापर! घरच्या घरी तयार करा आंघोळीसाठी खास साबण

SCROLL FOR NEXT