Pune Market Yard Police  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात कोयत्याची दहशत! कोयता विकण्यावरुन झाला वाद, पती-पत्नीने एकमेकांवर केले वार

Market Yard Police: या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून मार्केटयार्ड पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एका कॉलेजच्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर एका तरुणाने थेट कॉलेजमध्ये कोयता काढल्याची घटना घडली होती. या घटना ताज्या असतानाच आता पुण्यामध्ये पती-पत्नीमध्ये कोयता विकण्यावरुन कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर संतप्त पतीने पत्नीच्या डोक्यावर कोयता मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास मार्केटयार्ड पोलिसांकडून सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 29 जून रोजी पुण्याच्या मार्केट यार्ड येथील एका सोसायटीमध्ये घडली. ३७ वर्षांच्या व्यक्तीचे नवी पेठेत सलून आहे. ही व्यक्ती पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलासह याठिकाणीच राहते. त्यांच्या घरी चार दिवसांपूर्वी एक व्यक्ती आली होती. या वक्तीने झाडे कापण्यासाठी कोयता किंवा कैची विकत घ्यायची असल्याचे त्यांना सांगितले. पण आम्हाला कोयता किंवा कैची काहीच विकायचे नाही असे त्यांनी सांगितले.

पत्नीला घरात कोयता दिसल्याने तिने पतीला कोयता विकून टाका असे सांगितले. त्यावर पतीने पत्नीला सांगितले की, कोणी या कोयत्याचा गैरवापर केल्यास आपल्यालाच त्रास होईल. यावरुन या पती-पत्नींमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त पत्नीने पतीला खाली पाडून हाताने आणि पायाने मारहाण केली. कोयता विकण्यावरुन पती-पत्नींमध्ये झालेल्या या वादानंतर पत्नीने पतीला तुम्ही कोयता विकणार नाही तर तो माझ्या कामात येईल, असे सांगितले.

कोयत्यावरुन झालेल्या या वादात पतीने देखील पत्नीला मारहाण केली असल्याचे तिने पोलिसांना सांगतिले. ती घराबाहेर जाण्यासाठी दाराची कडी उघडत असताना पतीने पाठीमागून येऊन कोयता माझ्या डोक्यात मारला, असे महिलेने पोलीस तक्रारीमध्ये सांगितले आहे. जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी पती-पत्नी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, पुण्याामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर एका तरुणाने कॉलेजमध्ये कोयता काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोयत्याची दहशत माजवणाऱ्या कुणाल कानगुडे (१९ वर्षे) या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत कॉलेजमधूनच त्याची धिंड काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor : घरात बसवा या रंगाच्या टाईल्स, साफ-सफाई टेन्शनच होईल दूर

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

रत्नागिरीत थरारक अपघात! पोलीस गाडीला चिरडत २२ चाकांचा महाकाय कंटेनर दरीत; एका अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: Mumbai: नरभक्षक बिबट्याचा महिलेवर हल्ला; हल्ल्यात महिलेचा बळी

विद्यार्थ्यांसाठी १२८ दिवसांच्या सुट्ट्यांचे नियोजन जाहीर; 16 दिवसांची दिवाळीची सुट्टी; 24 नोव्हेंबरला ही सुट्टी

SCROLL FOR NEXT