Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

मेंटनन्सची विचारणा करायला गेलेल्या जेष्ठ नागरिकाला राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेच्या मुलाकडून मारहाण

पुण्यात एका जेष्ठ नागरिकाला माजी नगरसेविकेच्या मुलाकडून जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव -

पुणे: सोसायटीच्या मेंटनन्सची विचारणा करायला गेलेल्या एका जेष्ठ नागरिकाला माजी नगरसेविकेच्या मुलाकडून जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांच्या मुलाने ही मारहाण केली आहे.

समीर दुधाने असं आरोपीचं नाव असून वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात ( Warje Malwadi Police Station) पंकज जाधव यांच्या तक्रारीवरुन समीरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज जाधव हे कर्वेनगर परिसरातील माऊली रेसीडेन्सी मध्ये वास्तव्यास आहेत.समीर दुधाने यांनी ही इमारत बांधली असून इमारतीच्या मेंटेनन्सचे काम त्यांच्याकडेच आहे.

पाहा व्हिडीओ -

समीर यांनी सोसायटीच्या व्हाटस्अॅप ग्रुपवर इमारतीचे कॉमन बिल टाकले होते. बिल जरा जास्त वाटल्याने पंकज यांचे वडील आणि इतर दोन रहिवाशासह विचारणा करण्यासाठी समीर दुधाने यांच्याकडे गेले.

मात्र, बिलासंबंधी विचारणा केल्याचा समीरला राग आला आणि त्याने फिर्यादी यांच्या वडिलांना मारहाण केली. वडिलांना होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी पंकज गेले असता त्यांना देखील लाथाबुक्यानी मारहाण केली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT