Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात १५ वर्षीय मुलीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार; काळीमा फासणारी घटना

पुण्यात सहा जणांनी १५ वर्षीय मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Dnyaneshwar Choutmal

Pune Crime News : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापजक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात सहा जणांनी १५ वर्षीय मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune) चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संतापजक घटना घडली आहे. जय राजू तिंबोळे, ओम राजू तिंबोळे, किरण जावळे, शुभम सुनील जाधव, आणि अनिल जाधव, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

जुलै ते डिसेंबर २०२२ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी अनिल जाधव याने चाकूचा धाक (Crime News) दाखवून पीडितेचं अपहरण केलं. त्यानंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

आरोपी इतक्यावरच थांबला नाही. त्याने पीडितेचे नग्न फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींसोबतही पीडितेला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. जुलै २०२२ पासून आरोपींच हे कृत्य सुरू होते.

पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, आरोपी तिच्यावर जबसदस्ती अत्याचार करत होते. अखेर पीडितेचा संयम सुटला आणि तिने याप्रकरणाची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी पीडितेला घेऊन तातडीने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा आरोपींना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guava Benefits For Diabetes And Cholesterol: दररोज पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आक्षेपाहार्य पोस्ट

Tiger Shroff : टायगर श्रॉफची प्रकृती चिंताजनक? व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना धक्का

Political News : भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने तडकाफडकी सोडला पक्ष; राजकीय वर्तुळात खळबळ

Rock Salt: सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने काय होते?

SCROLL FOR NEXT