Pune Kidnapping Case Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: बघून चालत जा असं म्हटल्याने तरुणाची सटकली, तिघांचे अपहरण करत जबर मारहाण; ऑनलाईन पैसे उकळले

Pune Kidnapping Case: पुण्यामध्ये अपहरण करून तिघांना बेदम मारहाण करत जबरदस्तीने गुगल-पेवरून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची घटना समोर आली. ही घटना पुण्यातल्या वाघोली रोड परिसरामध्ये घडली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

चालताना धक्का लागला त्यामुळे बघून चालत जा असे म्हटल्याचा राग आल्याने काही तरुणांनी तिघांचे अपहरण केले. अपहरण केल्यानंतर या तिन्ही तरुणांना बेदम मारहाण करत जबरदस्तीने गुगल-पेवरून त्यांच्याकडून पैसे उकळले. ही घटना पुण्यातल्या वाघोली रोड परिसरामध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. लोणीकंद पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीमध्ये चालताना धक्का लागला या किरकोळ कारणावरून ५ जणांनी तिघांना जबरदस्ती कारमध्ये बसून त्यांचे अपहरण केले आणि त्यांना बेदम मारहाण केली. त्याचसोबत गुगल पेद्वारे त्यांनी त्यांच्याकडील पैसे लुबाडले. याप्रकरणी वाघोलीमध्ये राहणाऱ्या लोकामन हसमत हश्मी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी कुमार पवार, नितीन पवार, ओम गव्हाणे, मनोज निंबाळकर आणि विकास कांबळे या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकामन हश्मी, समीर हश्मी आणि विवेक गोस्वामी हे तिघेजण भाजी खरेदी करत होते. यावेळी एका १७ वर्षांचा मुलगा आनंदाने लोकामनच्या खांद्याला धक्का दिला. म्हणून त्याने आनंदाला बघून चालत जा असे सांगितले. या गोष्टी आनंदाला राग आला आणि त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने तिघांना मारहाण करायला सुरुवात केली.

आरोपींनी यावेळी आणलेल्या कारमधून तिघांचे अपहरण करून त्यांना दुसरीकडे नेले. लोकामन याच्याकडून जबरदस्तीने १८ हजार रुपये ऑनलाईन घेतले. यानंतर तिघांना पुन्हा जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच एकाचा मोबाईल काढून घेतला. अपहरण करत मारहाण करण्यात आलेल्या तिघांनी देखील पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पाचही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT