pune crime news file photo Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पोटात दुखल्याने मुलीला दवाखान्यात नेले, डॉक्टरच्या माहितीनंतर कुटुंब हादरलं; धक्कादायक बाब आली समोर

लग्नाचे आमिष दाखवत अवघ्या तेरा वर्षाची मुलीवर १९ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune Crime News : पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत अवघ्या तेरा वर्षाची मुलीवर १९ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) एकाच परिसरात राहणाऱ्या आणि ओळखीच्या असणाऱ्या एका तरुणाने १३ वर्षीय मुलीवर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर १९ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार मागील वर्षीच्या जानेवारी ते जून दरम्यान घडला आहे.

आरोपी आणि पीडित तरुणी हे एकाच परिसरात राहिला असून एकमेकांना ते ओळखतात. ओळख झाल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला घरी खेळण्यासाठी बोलवले आणि त्यानंतर "माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आपण लग्न (Marriage) करू" असे सांगितले. अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीचा अज्ञात पणाचा फायदा घेऊन या आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले.

काही दिवसांपूर्वी या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला डॉक्टरांकडे नेले असता तपासणीत ती २८ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला तुम्ही पाहिलाय का? अनेक पर्यटकांच्या नजरेआड आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Tuesday Horoscope: पैशाच्या समस्या दूर होणार, या ५ राशींना घ्यावी लागणार काळजी? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Accident News: बेंगळुरूहून मुंबईकडे निघाली ट्रॅव्हल्स बस, साताऱ्यात ड्रायव्हर बदलला; सारोळे उड्डाणपुलाजवळ येताच मोठा अपघात

Maharashtra News Live Update: करडे घाटात गोळीबार; सराईत गुन्हेगार विशाल काळेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT