Pune Koyata Gang News: पुण्यात कोयता गँगचा हैदोस थांबता थांबेना; हाणामारीत दोन जण जखमी

बाणेर येथील गणराज चौकात रात्री १० च्या सुमारास कोयता गॅंगने पुन्हा हैदोस घातला.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

Pune Crime News:पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ अद्यापही थांबलेला नाही. आतापर्यंत या टोळीतील ५ सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अन्य गुन्हेगारांचा शोध घेणे सुरू आहे. अशात काल रात्री बालेवाडी, बाणेर येथील गणराज चौकात रात्री १० च्या सुमारास कोयता गॅंगने पुन्हा हैदोस घातला. (Latest Crime News)

चार पाच जण दुचाकीवरून हातात कोयते घेऊन आले. या टोळक्यात भीषण हाणामारी झाली. यावेळी हाणामारीसाठी सिमेंटच्या मोठया विटा, बांबू, कोयते, दांडूच्या सहाय्याने त्यांनी दोन व्यक्तींवर हल्ला केला. या घटनेत दोघेही जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे , तसेच त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले असून पुढील तपास सुरू आहे. जखमींना नेमके कोणत्या रुग्णालयात हलविण्यात आले याची माहिती समजू शकलेली नाही.

Pune Crime News
Pune Crime News: लॉजवर नेऊन मामाच्या पोरीवर अत्याचार; आत्येभावाचं क्रूर कृत्य

दरम्यान, घटनास्थळी तीन दुचाकी मिळाल्याअसून, त्यातील एका दुचाकीचे (Bike) बरेच नुकसान झाले आहे. दुचाकीचे झालेले नुकसान पाहता इथे किती भयानक स्वरूपात राडा झाला असावा हे लक्षात येत आहे. ही मुलं कोण होती, कुठली होती याबद्दल माहिती मिळालीनसून पुढील तपास चतुष्रूंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करत आहेत.

Pune Crime News
Pune Sambhaji Maharaj Hording |स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज,पुण्यात राष्ट्रवादीचे पोस्टर

पुण्यातले दहशतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. काल पुण्यात कोयता गँगबरोबरच पालघन गँग सक्रिय असल्याचे समजले आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे गाडी हळू चालवा असे सांगितल्याने काही तरुणांनी हातात पालघन घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोठा वाद पाहायला मिळाला. सदर घटनेत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com