Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : विकृतीचा कळस! पुण्यात गाईचे पाय बांधून अनैसर्गिक अत्याचार; १६ वर्षीय तरुणाचं क्रूर कृत्य

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील (Pune Crime) हडपसर परिसर एका १६ वर्षीय मुलाने मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही संतापजक घटना १३ डिसेंबरला घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती हे पुण्यातील फुरसुंगी येथील कामठे आळी परिसरात राहतात. १३ डिसेंबरला घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जर्सी जातीची गाय बांधली होती.सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास १६ वर्षीय मुलगा त्याठिकाणी आला. त्याने गायीचे हातपाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक (Crime News) अत्याचार केला.

दरम्यान, हा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात येताच, त्यांनी पोलीस स्टेशन गाठत संबंधित मुलाविरोधात तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच हडपसर पोलिसांनी १६ वर्षीय मुलावर भादवी कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलं आहे. गौमता म्हणून मानत असलेल्या गाईवर १६ वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT