impri Chinchwad Police foil major conspiracy; SIT formed to probe murder plot against MLA Sunil Shelke. saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड, सूत्रधार कोण?

MLA Sunil Shelke Conspiracy : आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा धक्कादायक कट उघडकीस आला आहे.याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रचंड शस्त्रसाठा जप्त केला आणि संशयितांना अटक केली. गृहमंत्रालयाने डीसीपी विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीला चौकशीचे आदेश दिलेत.

Bharat Jadhav

  • तळेगाव दाभाडेत आमदार सुनील शेळके यांच्यावर जीवघेणा कट उघडकीस.

  • पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त करून आरोपींना अटक केली.

  • गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथक स्थापन.

दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे परिसरात आमदार सुनील शेळके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने मोठ्या शस्त्रसाठ्यासह आरोपींना जेरबंद केले असले तरी या कटामागील सूत्रधार कोण, याचा तपास करण्याची मागणी आमदार शेळके यांनी थेट पावसाळी अधिवेशनात केली होती. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार आज विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलीय.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत आदेश काढलेत. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्याकडे या एसआयटीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या पथकात सहायक आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात, सहायक निरीक्षक हरीश माने, अंबरीश देशमुख तसेच चार अंमलदारांचा समावेश आहे.

आमदार शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडणी करताना सांगितले होते की, “माझा आरोपींशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही. ते सर्वसामान्य कुटुंबातील असून इतका मोठा शस्त्रसाठा खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च कोण उचलतोय? नामांकित वकिलांची फी कोण भरतोय? त्यांना पाठबळ देणारा नेमका कोण आहे?” असे गंभीर सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली होती.

या थेट मांडणीमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर गृहराज्यमंत्री कदम यांनी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेला प्राधान्य देत सात दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आजपासून विशेष तपास पथक कामाला लागणार असून प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT