Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार, पीडिता ५ महिन्यांची गरोदर

Pune Police: पुण्यामध्ये १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सुरक्षारक्षकाने बलात्कार केला. पीडित मुलगी ५ महिन्यांची गरोदर राहिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

Priya More

Summary:

  • पुण्यामध्ये १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

  • सुरक्षारक्षकाने पीडितेवर अनेक वेळा केला बलात्कार

  • पीडित मुलगी ५ महिन्यांची गरोदर

  • पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये १५ वर्षांच्या मुलीवर सुरक्षा रक्षकाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत पीडितेसोबत हे भयंकर कृत्य केले. पीडित मुलगी ५ महिन्यांची गरोदर राहिली. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. या प्रकरणी पुण्याच्या लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शैलेशकुमार (वय २५ वर्षे) असं आरोपी सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तो येरवड्यातील जयजवान नगरमध्ये राहतो. शैलेश कुमार हा एका सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तो तिथेच तळमजल्यावरील रुममध्ये रहात होता. त्याने त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. जीवे मारण्याची धमकी देत त्याने वारंवार पीडितेवर बलात्कार केला. पीडिता ५ महिन्यांची गरोदर राहिली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या ४२ वर्षाच्या आईने लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार १६ नोव्हेंबर २०२५ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान सुरु होता. या महिलेने फिर्यादीत त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. कोणाला सांगितले तर मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांपूर्वी तिला त्रास होऊ लागला. तेव्हा तिला आईने ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे दिसून आले.

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी याची माहिती लक्ष्मीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी महिलेची फिर्याद घेऊन पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. याची कुणकुण आरोपी शैलेश कुमारला लागल्याने तो पळून गेला. लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

SCROLL FOR NEXT