Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: मॅट्रोमोनी साइटवर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत बलात्कार; प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत...

Pune Police: पुण्यामध्ये भयंकर घटना घडली. लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार करण्यात आला. प्रायव्हेट व्हिडीओ काढून आरोपीने तरुणीला ब्लॅकमेलिंग करत तिच्याकडून लाखो रुपये उकळले. या प्रकरणी सोलापूरच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर आरोपीने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ काढून या तरुणीला धमकावत तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मॅट्रिमोनी वेबसाइटवर झालेल्या ओळखीतून पुण्यातील एका तरुणीला सोलापूरच्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने या तरुणीचे प्रायव्हेट व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेलिंग केले. आरोपीने तिच्याकडून तब्बल दोन लाख रुपये उकळले. प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला मानसिक त्रास देण्यात आला.

या प्रकरणी पीडित तरुणीने खराडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. अमित गंगाधर शेंडगे (रा. पारगाव, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी आणि आरोपी यांची ओळख गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका मॅट्रिमोनी वेबसाइटवर झाली. लग्नाचे आमिष दाखवून अमित शेंडगेने तरुणीला विश्वासात घेतले. त्यानंतर तो पुण्यात आला आणि तरुणीची भेट घेऊन तिला एका हॉटेलमध्ये नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढले.

यानंतर आरोपी अमित शेंडगेने तरुणीचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ नातेवाइकांना पाठवेल आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून २ लाख रुपये उकळले. पीडित तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने 'विषारी औषध पिऊन आत्महत्या करीन आणि तुझे आणि तुझ्या कुटुंबीयांचे नाव चिठ्ठीत लिहीन,' अशी धमकी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास खराडी पोलिस करत आहेत. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT