Pune News x
मुंबई/पुणे

Pune : पतीशी पटतं नव्हतं म्हणून माहेरी आली, दुसऱ्याशी सुत जुळलं; पण नकार मिळाला, नंतर महिलेचं धक्कादायक कृत्य

Pune News : पुण्यात एका विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेचे पतीशी पटत नव्हते. त्यामुळे मागील ६-७ महिन्यांपासून ती माहेरी राहत होती. तिथे तिचे दुसऱ्याशी संबंध जुळले.

Yash Shirke

पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पतीसोबत पटत नसल्याने ही महिला माहेरी राहत होती. यादरम्यान तिचे दुसऱ्याच एका व्यक्तीशी सुत जुळले. या प्रेमसंबंधातून आलेल्या निराशेतून विवाहितेने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली जाधव ही विवाहिता पतीशी पटत नसल्याने माहेरी राहायला आली होती. सहा ते सात महिन्यांपासून माहेरच्या घरी राहणाऱ्या दीपालीचे तुषार कांबळे याच्याशी सुत जुळले. दीपालीने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह केला. पण तुषारने लग्नाला नकार दिला. त्यानंतर तुषारच्या मित्राने फोन करुन दीपालीला धमकावले.

लग्नाला नकार दिल्याने दीपाली खचली होती. त्यानंतर प्रवीण चोपडे याने दीपालीला फोन केला आणि तिला धमकावले. यामुळे नैराश्यात गेलेल्या दीपाली जाधनवे गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तुषार कांबळे आणि प्रवीण चोपडे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

२६ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास दीपाली जाधवने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर दीपालीचा भाऊ अभिजीत भोसले याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नामदे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

Shocking : भयंकर! भर रस्त्यात व्यावसायिकाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT