Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Pune Crime: पुण्यामध्ये एका तरुणाने आपल्या बायकोची हत्या केली आणि मृतदेह भट्टीत जाळला. दृश्यम चित्रपट पाहून त्याने हे भयंकर कृत्य केले. बायकोवर चारित्र्याचा संशय घेत त्याने तिची हत्या केली. या घटनेमुळे पुणे हादरले.

Priya More

सचिन जाधव, पुणे

चारित्र्याच्या संशयावरून पुण्यात एका व्यक्तीने बायकोची निर्घृण हत्या केली. आरोपीने तीन ते चार वेळा दृश्यम चित्रपट बघितला त्यानंतर त्याने बायकोची हत्या केली. दृश्यम स्टाईलने केलेल्या या हत्याकांडाचा उलगडा वारजे माळवाडी पोलिसांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली. बायकोची हत्या केल्यानंतर त्याने लोखंडी भट्टी तयार करून पत्नीचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर तयार केलेली भट्टी देखील नष्ट करून टाकली. या हत्याकांडाच्या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

बायकोच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात गेला आणि बायको बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करू लागला. मात्र पोलिसांसमोर त्याचे बिंग फुटले आणि दृश्यमस्टाईल या हत्याकांडाचा उलगडा झाला. समीर जाधव असे आरोपीचे नाव असून पेशाने तो फब्रिकेशनचे काम करतो. अंजली समीर जाधव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ती खासगी शिक्षिका म्हणून एका शाळेत काम करत होती. चारित्र्याच्या संशयातून समीरने तिची हत्या केल्याचे पोलिस तपासातून उघड झाले. त्याने पूर्वनियोजित कट करून बायकोचा संपवलं.

आरोपी फॅब्रिकेशन काम करत असून तो मूळचा अमरावतीचा रहिवासी आहे. पुण्यात शिवणे परिसरात तो बायकोसोबत राहत होता. २०१७ मध्ये समीर आणि अंजली या दोघांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. एक तिसरी आणि एक पाचवीत शिक्षण घेत आहेत. मुलं दिवाळी सुट्टीमुळे गावाला गेले होते. आरोपीचे एका महिलेचे अनैतिक संबंध होते. त्याने बायकोवर अनैतिक संबंधाचे आरोप केले. त्याने एका मित्राला बायकोच्या मोबाईलवर आय लव्ह यूचा मेसेज केला आणि त्यालाही आरोपीने रिप्लाय दिला. यावरून तो बायकोवर संशय घेत होता.

खेड शिवापूरजवळ गोगलवाडी येथे त्याने एक गोडाऊन भाड्याने घेतले. २६ ऑक्टोबरला कार घेऊन तो बायकोला गोडाऊन दाखवायला घेऊन गेला. त्याच ठिकाणी त्याने बायकोची गळा दाबून हत्या केली. त्या ठिकाणी भट्टी केली आणि त्यात मृतदेह जाळला आणि राख नदीत फेकून दिली. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी बायको मिसिंग झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात जाऊन दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास केला असता त्यानेच हे केले असल्याचे समोर आले.

आरोपीची बायको बेपत्ता असल्याचा तपास करताना पोलिसानी सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून तपास केला असता. बेपत्ता महिलेचा तक्रारदार पती हा वारंवार पोलिस ठाण्यात येऊन माझ्या बायकोचा कधी शोध घेणार याबाबत आत्मीयतेने चौकशी करत होता. त्यामुळे तक्रारदार नवऱ्याच्या हालचाली, बायको बेपत्ता झाली त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासकरून पोलिसांनी हत्येचा उलगडा लावला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आमदार सचिन अहिर यांनी आमदार अमोल मिटकरींना दिला नवा चष्मा गिफ्ट

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

Rapido Viral Video: रॅपिडोचालकाचं अश्लील कृत्य! बाईकवर बसलेल्या महिलेला केला स्पर्श; VIDEO शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT