Lonikand Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: सासू घरात राहत असल्याने जावयाची सटकली; मारहाण करत केला चाकू हल्ला

Lonikand Police Station: सासूचं आपल्या घरात राहणं आवडत नसल्याने जावयाने तिला बेदम मारहाण करत मेहुणीवर चाकू हल्ला केला. पुण्याच्या वाघोली परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

सासू घरात राहत असल्याचा राग अनावर झाल्यामुळे पुण्यात एका व्यक्तीने सासूला जबर मारहाण करत चाकू हल्ला केला. पुण्याच्या वाघोलीमध्ये ही घटना घडली आहे. आईला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या मेहुणीवर देखील त्याने चाकू हल्ला केला. या घटनेमुळे वाघोली परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.

पुण्यातल्या वाघोलीमधील केसनंद रोडवर रोशन डेव्हिड मंडलिक (वय ३९ वर्षे) हा आपल्या पत्नीसोबत राहतो. त्याच्या घरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सासू राहत होती. सासूचे इतक्या दिवस घरामध्ये राहणं रोशनला खटकत होते. त्यामुळे वारंवार त्यांच्यामध्ये खटके उडत होते. अशामध्ये बुधवारी तू माझ्या घरी का राहतेस? आताच्या आता घरातून निघून जा असं म्हणत रोशनने सासूला मारहाण केली.

तेव्हा वाद मिटवण्यासाठी मध्ये आलेल्या मेहुणीवर त्याने चाकूने वार केले. यामध्ये त्याची मेहुणी गंभीर जखमी झाली. या प्रकरणी सासूने लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत जावायाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी रोशन मंडलिकविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सध्या रोशनच्या मेहुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावयाने मारहाण केलेली पीडित महिला तिच्या छोट्या मुलीच्या घरी रहाते. जावई रोशनला सासूचे त्याच्या घरात राहणे अजिबात आवडत नव्हते. बुधवारीघरी आल्यानंतर त्याने सासूला तू माझ्या घरी कधीपर्यंत राहणार आहे. तू माझ्या घरातून निघून जा, असे म्हणत तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तेव्हा पीडित महिलेची मोठी मुलगी दिपाली ही त्यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडली.

तेव्हा रोशनने तिला शिवीगाळ करुन तू मध्ये का आलीस? असे म्हणून घरात जमिनीवर पडलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने तिच्यावर हल्ला केला. या चाकू हल्ल्यात दिपालीच्या डाव्या हाताच्या दंडावर मारुन तिला जखमी केले. यावेळी पीडित महिला ही जावयाच्या हातातून चाकू काढून घेत असताना त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली. लोणीकंद पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT