PUNE CRIME: 19-YEAR-OLD YOUTH KILLED IN KOYTA GANG ATTACK ON SINHAGAD ROAD saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

19-Year-Old Youth Killed in Pune : पुण्यातील सिंहगड रोडवरील आनंद नगरजवळ कोयता टोळीने केलेल्या हल्ल्यात एका १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bharat Jadhav

पुणे शहरात कोयता गँग आणि सराईत गुन्हेगारांनी धुमाकूळ घातलाय. वाघोलीनंतर पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील एका १९ वर्षीय तरुणावर कोयता हल्ला झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भरवस्तीत हत्येची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील आनंद नगर चौक परिसरात 19 वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे. पूर्व वैमानस्यातून ही हत्या झाली असून चार ते पाच जणांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला. मृत तरुण धायरी भागातील रहिवासी असून करण काशीद नाव असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. पूर्वी तो माणिक बागेतील अमृता नगर परिसरात राहत होता गेल्या दोन-तीन महिन्यापासून धायरीत वास्तव्यास आहे. अधिक तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

करण गिरीश काशीद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण हा सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथील संतोष हॉल परिसरात थांबला होता. यावेळी दोन ते तीन हल्लेखोर त्या ठिकाणी आले. काही समजण्याच्या आतच त्यांनी लोखंडी हत्याराने करणवर हल्ला केला. ​हल्लेखोरांनी करणच्या शरीरावर सपासप वार केले.

भरवस्तीत ही घटना घडल्याने परिसरात एकच पळापळ झाली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. ​प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत करण काशीद आणि आरोपींमध्ये पूर्वीचा वाद होता. याच वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

हत्येची माहितीमिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Tourism : शाळेला सुट्टी पडली; लाडक्या मुलांसोबत प्लान करा फॅमिली ट्रिप, फिरा ठाण्यातील 'ही' २ सुंदर हिल स्टेशन्स

Jaljeera Benefits: उन्हळ्यात थंडगार जलजीरा प्यायल्याने शरीराला मिळतात हे ७ फायदे

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत तुमरकोठी गाव उजळलं; पोलीस दलाच्या प्रयत्नांनी वीज सेवा सुरू

APY Scheme: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! २ कप चहाचे पैसे वाचवा अन् ₹५००० पेन्शन मिळवा

MLC Election: जय पवारांना विधान परिषदेत पाठवा! आमदार मिटकरींचं सुनेत्रा पवारांना पत्र

SCROLL FOR NEXT