Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात गोळीबाराचा थरार! बायकोसोबत टोकाचा वाद, नवऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी

Pune Firing: पुण्यामध्ये गोळीबाराची भयंकर घटना घडली. नवरा -बायकोच्या भांडणात ही घटना घडली. नवऱ्याच्या हाताला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे.

Priya More
  1. पुण्यात नवरा- बायकोच्या वादातून गोळीबार

  2. कसबा पेठमध्ये कौटुंबिक वादानंतर नवऱ्याने स्वतःवर झाडली गोळी

  3. पुण्यातील गोळीबाराच्या घटनेत तरुणाच्या हाताला गोळी लागली

  4. फरासखाना पोलिसांकडून तपास सुरू

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात गोळीबाराची थरारक घटना घडली. नवरा -बायकोच्या वादातून हा गोळीबार झाला. पुण्यातील कसबा पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ नवरा-बायकोमधील कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर हा गोळीबार झाला. या घटनेत तरुणाच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरा-बायकोमध्ये झालेला वाद इतका तीव्र झाला की दोघांनीही एकमेकांना गोळी मारण्याबाबत बोलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नवऱ्याने बायकोला कथितरित्या 'स्वतःला गोळी मार' असे सांगितले. तर नवऱ्याने बायकोला 'मलाच गोळी मार' असे म्हटल्याची माहिती मिळत आहे. दोघांच्या या वादात बंदुकीतून गोळी सुटली आणि नवरा जखमी झाला.

या भांडणात संतप्त झालेल्या नवऱ्याने शेवटी स्वत:वरच गोळी झाडून घेतली आणि त्याच्या उजव्या हाताला गोळी लागली. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर तरुणाच्या बायकोनेही रुग्णालयात धाव घेतली. या गोळीबाराच्या घटनेमुळे कसबा पेठ परिसर हादरला. नेमकं कोणत्या कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला होता याचे कारण अद्याप समोर आले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग, एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून शस्त्रासह इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. नवरा-बायकोमधील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला?, गोळी कोणी झाडली?, शस्त्र कोणाच्या ताब्यात होते? आणि गोळीबार नेमका कसा झाला?, याचा फरासखाना पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Aadhaar Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! मोबाईल नंबर बदलण्यासाठी ही प्रोसेस करा फॉलो

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

Kas Pathar Flower Festival 2026: कास पठारचं खुलणारं सौंदर्य, 'फुलोत्सव' लवकरच; ऑनलाईन बुकिंग कशी कराल आणि पैसे किती ? जाणून घ्या

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; शिक्षण क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT