PUNE SHOCKER: HUSBAND ACCUSED OF ACID ATTACK ON WIFE IN URULI KANCHAN Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : पुणे हादरलं! पतीने पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, १५ दिवस घरात कोंडून ठेवत केली मारहाण

Pune Urali Crime News : पुण्यातील उरुळी कांचन येथे पतीने पत्नीवर ॲसिड हल्ला केल्याचा गंभीर आरोप. महिला गंभीर जखमी असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Alisha Khedekar

  • उरुळी कांचनमध्ये पतीने पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला केला

  • महिला गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

  • आरोपीने १५ दिवस घरात कोंडून ठेवल्याचा आरोप

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू

सचिन जाधव, पुणे

पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरात मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने स्वतःच्या पत्नीवर अमानुष अत्याचार करत तिच्या गुप्तांगावर ॲसिड टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच जखमी महिलेच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर महिलेचा पती हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप करण्यात आला. " तुला दोन मुलीचं, मुलगा होत नाही,” या करणावरून पीडितेला मारहाण देखील करण्यात आली. संबंधित दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून या कारणांवरून वाद सुरू होते. या वादातूनच संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर अत्याचार करत तिच्यावर ॲसिड फेकल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या भीषण प्रकारात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या शरीराला मोठी इजा झाली आहे.

धक्कादायक म्हणजे या अमानुष कृत्यानंतर आरोपीने पीडितेला दवाखान्यात उपचारासाठी न घेऊन जाता १५ दिवस घरात कोंडून ठेवण्यात आले. अखेर ९ मे रोजी पती कामावर गेल्यानंतर महिलेने दोन्ही मुलींना सोबत घेतले आणि आपले माहेर गाठले. माहेरी सर्व प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, पोलिसांनी तातडीने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवले, जिथे उपचार घेतल्यानंतर १५ मे रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. या अमानुष प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

पोलीस स्टेशमध्ये आदित्य,अमितचा 'ठाकरेबाणा', जीपच्या टपावर उभं राहत सरकारला दिला इशारा| Photos

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार की थेट ₹४,००० जमा होणार? कुणाला मिळणार डबल पैसे? पाहा अपडेट

Skin Care: ऑक्टोबर हिटमुळे चेहरा ड्राय आणि काळा पडलाय? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय

SCROLL FOR NEXT