Shocking incident in Pune’s Kothrud: Son stabs father to death over TV dispute on Dussehra. saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: टीव्ही बंद करायला लावली अन् राक्षस जागा झाला; दसऱ्याच्या दिवशीच मुलाकडून बापाची निर्घृण हत्या

Son Kills Father Over TV Dispute : दसऱ्याच्या दिवशी मुलानं वडिलांचा खून केल्याची घटना पुण्यातील कोथरूडमध्ये घडलीय. टीव्ही बंद करायला सांगितल्यामुळे मुलांनी वडिलांचा खून केल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

  • कोथरूड परिसरात दसऱ्याच्या दिवशी मुलाकडून बापाचा खून.

  • टीव्ही बंद करण्यावरून वडील-मुलामध्ये वाद झाला.

  • सचिन तानाजी पायगुडे (३३) या मुलानं चाकूनं वडिलांचा खून केला.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

दसऱ्याच्या दिवशी कोथरूड परिसरात धक्कादायक घटना घडलीय. जय भवानीनगरमध्ये एका मुलाने चाकूने वार करत वडिलांचा खून केला. खून करण्याचं निमित्त ठरलं टीव्ही. वडिलांनी टीव्ही बंद करायला लावल्यानं मुलानं बापावर चाकूनं वार केला. सचिन तानाजी पायगुडे अस आरोपी मुलाचे नाव आहे.

आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय ३३) याला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तानाजी यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पायगुडे कुटुंब जय भवानीनगर येथील चाळ क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास आहेत. दसऱ्याच्या दिवशी दुपारी साधारणपणे बारा वाजता सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता.

त्यावेळी वडील तानाजी यांनी त्याला "टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक" असे सांगितलं. यावरून दोघा बापलेकात वाद झाला. रागाच्या भरात सचिन याने वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला. त्याने तानाजी यांच्या तोंडावर आणि गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सणाच्या दिवशीच घराघरात आनंदाचे वातावरण असताना जय भवानी नगरमध्ये घडलेल्या या खुनाच्या घटनेने नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: अस्सल मराठमोळं सौंदर्य, प्राजक्ताच्या लेटेस्ट फोटोशूटने केलं सर्वांनाच घायाळ

आपण सोबत निवडणूक लढलो...पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, VIDEO

Maharashtra Live News Update: महाबळेश्वरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन

Maharashtra Politics : घराणेशाहीचा रेकॉर्ड मोडला; भाजप अन् शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

Winter Health: हिवाळ्यात दिवसभर किती लिटर पाणी प्यावे?

SCROLL FOR NEXT