Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Crime: आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १० जण अटकेत

Pune Crime News: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरातील उच्चभ्रू भागात ही मोठी कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी दहा सट्टेबाजांना अटक केली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. १६ एप्रिल २०२४

आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या टोळीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरातील उच्चभ्रू भागात ही मोठी कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी दहा सट्टेबाजांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचारी कोथरूड (Kothrud) भागात रविवारी गस्तीवर होते. त्यावेळी भुसारी कॉलनी परिसरातील एका सोसायटीमध्ये आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली.

याच माहितेच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सोसायटीतील सदनिकेत छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी दहा सट्टेबाजांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या ताब्यातून १६ मोबाईल, दोन लॅपटॉप असा सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुकेशकुमार साहू, देवेंद्र यादव, जसवंत साहू, राहुलकुमार यादव, रोहितकुमार गणेश यादव, दुष्यांत सोनकर, संदीप मेश्राम, अखिलेश ठाकूर, महम्मद इस्माईल सौदागर आणि अमित कैलास शेंडगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Importance Of Sleep : मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी पुरेशी झोप का महत्वाची? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Protect Your Phone: सावधान! फक्त कॉल मेसेज नाही, आता स्क्रीनही हॅकर्सच्या रडारवर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का; ठाण्यातील बाप-लेकानं सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Jintur Crime : आपसी वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्याकाठ्या अन् लोखंडी रॉडने मारहाण, आठ जण जखमी

Maharashtra Live News Update: राहुल पाटील यांचा काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (AP )मध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT