खेडमध्ये गुंडांच्या टोळीनं ग्रामस्थांवर हल्ला केला असून, एकाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले. ही धक्कादायक दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.  saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यातील खेडमध्ये गुंडांच्या टोळीचा धुडगूस, नागरिकांवर हल्ला, एकाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, VIDEO

khed village gang attack citizens beaten cctv viral video : पुण्यातील खेडमध्ये धक्कादायक घटना घडली. गुंडांच्या टोळीनं हैदोस घातला. नागरिकांना मारहाण केल्यानंतर एका ग्रामस्थाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले.

Nandkumar Joshi

सागर आव्हाड, खेड | साम टीव्ही

पैशांवरून झालेला वाद टोकाला गेला आणि गुंडांच्या टोळीनं अख्ख्या गावात धुडगूस घातला. गावात दहशत माजवणाऱ्या गुंडांच्या टोळीनं नागरिकांवर हल्ला चढवला. तसंच एका ग्रामस्थाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

पैशांच्या देवाण-घेवाणीवरून ही घटना घडली. पुण्यातील खेड तालुक्यातील काळूस गावात चारचाकी वाहनांतून गुंडाची टोळी आली. त्यांनी गावात अक्षरशः धुमाकूळ घातला. तेथील काही नागरिकांवर हल्ला केला. त्यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. मारहाणीच्या घटनेनंतर एका ग्रामस्थाला गुंडांच्या टोळीनं थेट कारच्या बोनेटवरून फरफटत नेले. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुंडांच्या टोळीनं गावात घुसून नागरिकांना अमानुषपणे मारहाण केल्यानं काही काळ तणावाचे आणि भीतीचे वातावण निर्माण झाले होते. गुंडांच्या टोळीनं नागरिकांवर अचानक हल्ला केला. रस्त्यावरच त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. बराच वेळ भररस्त्याच गोंधळ निर्माण झाला होता.

ही संपूर्ण घटना ज्या ठिकाणी घडली, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. आरोपी कोण होते, कुठून आले होते, याचा तपास केला जात असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

गावात दहशत माजवणाऱ्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: सून- सासऱ्याच्या अफेअरने संपूर्ण कुटुंबाचा शेवट, नवऱ्याने स्वत: विष पित बायकोला दिलं; नंतर वडील अन् भावाचा मृतदेह आढळला

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र बंदला मनमाड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, सकाळ पासून शहरात कडकडीत बंद

NEET Paper Leak : पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

Maharashtra Bandh: आज 'महाराष्ट्र बंद'; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या सविस्तर

पावसाळ्यात प्या हेल्दी आणि टेस्टी 4 घरगुती सूप, झटक्यात वजन होईल कमी

SCROLL FOR NEXT