Pune: शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी; महापौरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली तीन कोटींची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा

Pune News: भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत, अशी मागणी केल्याचे समोर आले आहे..

Dnyaneshwar Choutmal

Murlidhar Mohol News: पुण्यात भाजपचे (BJP) माजी महापौर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि त्यांचा मावसभाऊ रवी आटोळे यांच्या नावाने एका बिल्डरला तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)

याबाबत तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, पौड रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करून त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली.

भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहोचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिली.

आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला. हा प्रकार बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT