Malkapur Mahavitaran News : वीज चोरी प्रकरणी मलकापूरातील काँग्रेस नेत्यास दहा लाखांचा दंड

विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मलकापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Mahavitran, buldhana, congress leader, malkapur
Mahavitran, buldhana, congress leader, malkapursaam tv

Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मलकापूर (Malkapur) येथे काँग्रेस (Congress) नेत्याने वीज चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गेल्या सव्वा दोन वर्षांपासून वीज चोरी सुरु असल्याची माहिती समाेर आली आहे. त्यानूसार वीज वितरणच्या बुलढाणातील भरारी पथकाकडून 60 हजार 978 युनिटची चोरी केल्याने नेत्यास 10 लाख 47 हजार 922 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Maharashtra News)

Mahavitran, buldhana, congress leader, malkapur
Onion Price : कांद्याला बोली लागली अन् मिळाला अवघा सव्वा रुपया; शेतकऱ्यांची क्रूर थट्टा थांबणार कधी ?

मलकापुरामध्ये एका मोठ्या काँग्रेस नेत्याकडून आपल्या रुग्णालयात आणि आपल्या घरात वीज चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे. बुलढाणा विद्युत वितरणाच्या भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात असलेल्या विद्युत मिटरची तपासणी केली असता विद्युत मिटरमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले आहे.

यावेळी मिटरची तपासणी करून गेल्या सव्वा दोन वर्षांपासून ही वीज चोरी सुरू असल्याचे आणि 60 हजार 978 युनिटची चोरी केली असल्यामुळे विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून या काँग्रेस नेत्याला 10 लाख 47 हजार 922 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Mahavitran, buldhana, congress leader, malkapur
Uddhav Thackeray Faction : ठाकरे गटाच्या खासदारास जीवे मारण्यास ३ कोटींची सुपारी, देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार

या कारवाई दरम्यान भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय व घरात लावलेले विद्युत मिटर जप्त केले आहे. विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मलकापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

विद्युत मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या काँग्रेस नेत्याने तीन टर्म मलकापूर विधानसभेमध्ये निवडणूक सुद्धा लढवलेली आहे. एकदा अपक्ष तर दोनदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर त्यांनी निवडणूक लढवलेली आहे.

Mahavitran, buldhana, congress leader, malkapur
Mahila Maharashtra Kesari Kusti Spardha : महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मल्लांचे हाल, फरशीवर बसून लागलं जेवायला, पाण्याचा ठणठणाट

त्याशिवाय निवडणूक लागण्याच्या अगोदर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ते मुख्य प्रशासक म्हणून कारभार पाहत होते. यामुळेच संपुर्ण मलकापूर शहरात काँग्रेस नेत्याने केलेल्या प्रकाराची चर्चा सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com