Sanjay Raut News: 'अश्रू पुसायला भेटले असतील...' CM शिंदे- राज ठाकरे भेटीवर राऊतांची खोचक टीका; सावरकर मुद्द्यावरुन कॉंग्रेसलाही इशारा

Maharashtra Politics: सावरकर हे आमच्या श्रध्देचा विषय आहेत. त्यांच्याबद्दलची अशी वक्तव्ये खपवून घेणार नाही, असे कॉंग्रेसला सांगितले असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSAAM TV

Sanjay Raut News: कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. तसेच, आपण घाबरत नसल्याचंही ते म्हणाले.

याचवेळी त्यांनी “माफी मागायला माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे”, असाही उल्लेख केला. त्यांनी सावरकरांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर भाजपाकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंवरही टीका होताना दिसत आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका स्पष्ट करत राहुल गांधींना इशारा दिला आहे. (Maharashtra Politics)

Sanjay Raut News
Rohit Pawar : आता हा प्रश्न मनसेच्या कार्यकर्त्यांना पडू लागला आहे : राेहित पवार

काय म्हणाले खासदार संजय राऊत..

"सावरकर हे आमच्या श्रध्देचा विषय आहेत. त्यांच्याबद्दलची अशी वक्तव्ये खपवून घेणार नाही, असे कॉंग्रेसला सांगितले असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्रात वीर सावरकर यांचा अपमान कधी स्वीकारणार नाही कारण लहानपणापासून सावरकरांपासून प्रेरणा घेत लढायला उतरलेलो आहोत. याबद्दल मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनीही आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचेही" संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच मी आज दिल्ली येथे जात आहे तर राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Sanjay Raut News
Crime News : हृदयद्रावक! भावानेच अवघ्या १० वर्षीय लहान भावाचा दिला बळी; कारण ऐकून तुमचंही काळीज हादरेल

एकनाथ शिंदे- राज ठाकरेंच्या भेटीवर टीका...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल भेट घेतली. यावर बोलताना "एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची म्हणजे सधू- मधूची भेट आहे. बालभारतीप्रमाणे ते जुने मित्र असतील किंवा नव्याने प्रेम उफाळून आले असेल, असे संजय राऊत म्हणाले. तसेच मालेगावातल्या सभेनंतर त्यांच्या भावना उफाळून आले असतील एकमेकांच्या अश्रू पुसायला त्यांची भेट झाली असेल," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com