pune crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? बिबवेवाडीत भरदिवसा गोळीबार, तरुण गंभीर जखमी

Pune Crime News: पुण्यात एका तरूणावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय. बिबवेवाडीमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एका तरूणावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. पुण्यातल्या बिबवेवाडी येथील संविधान चौकात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घडली. या घटनेत पवन गवळी नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीला गोळी लागली आहे. पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरु आहे.

घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. भर रस्त्यावर ही घटना घडल्याने बिबवेवाडीमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांना दोन्ही आरोपींची माहिती मिळाली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: खुशखबर! आता PFचे पैसे UPI ने मिनिटात खात्यात जमा होणार, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Skin Tips: मऊ आणि मुलायम त्चचेसाठी रात्री चेहऱ्यावर काय लावावे?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Celebrity Style Mangalsutra: सेलिब्रिटीस्टाईल शॉ्र्ट आणि युनिक मंगळसूत्र हवेत? हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT