CCTV footage shows the brutal murder of Ganesh Kale in Pune’s Kondhwa; police arrest four accused within hours. saam tv
मुंबई/पुणे

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Ganesh Kale Killing CCTV Footage Video: पुण्यातील कोंढवा परिसरातील हत्याकांडाचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक गणेश काळेवर दिवसाढवळ्या क्रूर हल्ला करताना दिसत आहे.

Bharat Jadhav

  • गणेश काळे हा कोमकर गँगचा सदस्य असलेल्या समीर काळेचा भाऊ

  • काही तासांतच चार आरोपींना अटक केली

  • समीर काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहे.

पुण्यातील कोंढव्या परिसरात गणेश काळे नावाच्या एका रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणातील चार आरोपींनी पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आंदेकर-कोमकर गँगवॉरमधूनच गणेश काळेची हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. आता या हत्येप्रकणाच एक सीसीटीव्ही समोर आलाय.

गणेश काळे हा कोमकर गँगचा सदस्य असलेल्या समीर काळेचा भाऊ आहे. समीर काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणी तुरुंगात आहे. त्यामुळेच गणेश काळेची हत्या करण्यात आली का याचा तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान गणेशची हत्या करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी चार तासात अटक केली. या चार आरोपींपैकी एक आरोपी हा रील स्टार असल्याची माहिती आता समोर येतेय.

आरोपीना खेड शिवापूर परीसरात मधून कोंढवा डीबी पथकाने अटक केली. गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तूल आणि दोन हत्यारं जप्त करण्यात आली. अमन महेबुब शेख,(22 वर्ष), अरबाज अहमद पटेलसह दोन अल्पवयीन मारेकरी असून त्यांना अटक करण्यात आली आहे. चारही आरोपी हत्या केल्यानंतर एका गाडीवर बोपदेव घाट दिशेने गेले होते.

शनिवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान कोंढव्यातील सासवड रोडवरील खडी मशीन चौकात रिक्षाने जाणाऱ्या गणेशला वाटेत गाठत या चौघांनी ठार मारलं. या हत्येचा सीसीटीव्ही समोर आलाय. एका पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झालीय. या व्हिडिओमध्ये आरोपी गणेशवर हल्ला करून पळून जाताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणं त्यांचं स्वप्न, पण...; राज ठाकरेंचा निशाणा कुणाकडं?

Dhirde Recipe : कपभर गव्हाच्या पिठाचे बनवा पौष्टिक धिरडे, लगेच रेसिपी लिहून घ्या

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे ते दीपाली सय्यद 'बिग बॉस मराठी ६'मध्ये कोण कोण झळकणार? भाऊच्या धक्क्यासाठी रितेश देशमुख सज्ज

Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस नागपूरचे, मुंबईत जन्माला आल्याशिवाय प्रॉब्लेम कळणार नाही, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर कडाडले

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २०२६ मध्ये खरंच पगार वाढणार का? आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT