Bhiwandi Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: गणपतीसाठी कमी वर्गणी दिल्याचा राग, चहावाल्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Latest News Update: गणपतीसाठी कमी वर्गणी दिल्याने एका चहावाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली.

Gangappa Pujari

Pune Crime News:

शहरभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गणपतीसाठी कमी वर्गणी दिल्याने एका चहावाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली. याबाबत व्यावसायिक गणेश संतोष पाटणे यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कॅम्प परिसरात महात्मा गांधी रोडवर गणेश संतोष पाटणे यांचे श्रीनाथ टी स्टॉल आहे. शनिवार (२३, सप्टेंबर) ला त्यांच्या दुकानावर १५ ऑगस्ट चौकातील गणपती मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे वर्गणी मागण्यासाठी आले होते. यावेळी वर्गणीच्या रकमेवरुन कार्यकर्ते आणि गणेश पाटणे यांच्यात वाद झाला.

गणेश पाटणे यांनी गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) १५१ रुपयांची वर्गणी घेण्याची विनंती केली परंतु मंडळाचे कार्यकर्ते १००० रुपयांची वर्गणी मागत होते. याच कारणाने त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

हा वाद वाढल्याने आरोपींनी टी स्टॉल चालकास बेदम मारहाण केली तसेच 'तुझा धंदा कसा चालतो तेच बघतो...' अशी धमकीही दिली. या प्रकरणात गणेश पाटणे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात नीलेश दशरथ कणसे (वय ३९) आणि अविनाश राजेंद्र पंडित (वय ३२) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT